शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नसताना मी एका प्रतिभावंत गायकाचा ‘आतला’ स्वर ऐकला होता!
कुमार गंधर्व लेककडे तोंड करून गर्दीत एकटेच काठीवर रेलून उभे होते. मला अप्रूप वाटलं. मी त्यांच्या मागे जाऊन त्यांना न्याहाळत उभा राहिलो. त्यांना कुणीच ओळखत नव्हतं. ते काही गुणगुणत होते, लेककडे बघून. त्यांचंही इतरत्र लक्ष नव्हतं. मी अगदी त्यांच्या मागे जवळ जवळ खेटूनच उभा राहिलो. त्यांना असं प्रथमच पाहत होतो. जीवाचे कान करून त्यांचं आत्मगान जवळ जवळ ४०-४५ मिनिटं ऐकलं. कुमारजींची ती बैठक मी एकटाच ऐकून श्रीमंत झालो होतो!.......